शॉर्टसर्किटमुळे तीन दुकानांना आग लाखों रुपयांचा माल खाक

Khozmaster
2 Min Read

देऊळगाव मही:-तालुका प्रतिनिधी

येथील खामगाव-जालना महामार्गावरील संदीप किराणासह अन्य तीन दुकानांला २३ मार्च रोजी अचानक भीषण आग लागली. या आगीत लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग शॉटसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.या आगीच्या घटनेमुळे स्थानिक नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती. आग लागल्याच्या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच आग विझवण्यासाठी शेकडो हात समोर आले. स्थानिक शिवाजी विद्यालयासमोर विजय श्रीराम शिंगणे यांच्या मालकीचे संदीप किराणा दुकान आहे. त्याच्या बाजूला संजय पहाड यांचे फायबर फर्निचर दरवाजे विक्रीचे दुकान तसेच शेख नसीम यांचे सायकल स्टोअर व सुनिल शिंगणे यांचे दुकान आहे. संदीप किराणा दुकानासह अन्य तीन दुकाने जवळ जवळ असल्यामुळे कुठल्यातरी एका दुकानात शॉटसर्किट होवून आग लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. हळूहळू आगीने पेट घेतल्यामुळे आगीने भीषण रूप धारण केल्याने काही क्षणातचं होत्याचे नव्हते झाले. चारही दुकानातील किराणा, सायकल दुकानातील टायर, ट्यूब, फर्निचर दरवाजे, गोळ्या बिस्कीट यासह अनेक साहित्य जळून खाक झाले आहे. याप्रसंगी आग विझाविण्यासाठी पाण्याच्या टँकरने गावातील नागरिकांनी मोठ्या धाडसाने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन गाडीला देखील पाचरण करण्यात आले होते. यावेळी महसूल विभागाचे तलाठी संदीप वायाळ यांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून प्राथमिक पंचनाम्यात अंदाजे ४० लाखांचे नुकसान झाले आहे. दरम्यान शिवसेनेचे युवा नेते श्रीनिवास खेडेकर यांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची पाहणी केली व दुकान मालकांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

0 9 5 3 2 4
Users Today : 50
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *