दिव्यांगांच्या विविध मागणीसाठी अर्धनग्न आंदोलन

Khozmaster
1 Min Read

सिंदखेड राजा:-तालुका प्रतिनिधी 

दिव्यांगाच्या प्रलंबित मागण्या मंजूर करण्यासाठी सिंदखेडराजा येथे २४ मार्च रोजी – राजमाता जिजाऊंच्या – राजवाड्यापासून ते थेट – तहसील कार्यालयापर्यंत शेतकरी नेते कैलास – मेहेत्रे व त्यांच्या समर्थकांनी अर्धनग्न आंदोलन केले.याबाबत तहसीलदार अजित दिवटे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिव्यांगाचे आंदोलन याच्या माध्यमातून दिव्यांग्याच्या प्रलंबित मागण्या अपंग वित्त विकास महामंडळाचे कर्ज प्रकरण निकाली काढून दिव्यांगण दरमहा ६ हजार रुपये मानधन मिळाले पाहिजे, शासन निर्णयामध्ये दिव्यांग ना विशेष सवलत देण्यात यावी, अपंगांना व्यापारी गाळे भाडे देण्यात यावे, अंत्योदय कार्डचा कॅम्प आयोजित करावा यासह अन्य मागण्या निवेदनाव्दारे करण्यात आल्या आहेत. यावेळी शेतकरी नेते कैलास मेहेत्रे यांच्यासह सिंदखेडराजा तालुक्यातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

0 9 5 3 2 4
Users Today : 50
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *