खामगाव ते माहूर गड बससेवा सुरू

Khozmaster
1 Min Read

खामगाव:-तालुका प्रतिनिधी 

एसटी महामंडळाच्या वतीने खामगाव ते माहूर गड पर्यंत भाविकांसाठी २२ मार्च रोजी दुपारी २ वाजता एसटी बस सुरू करण्यात आली आहे. माजी मेजर सुभाष फेरन जिल्हा अध्यक्ष भाजप सैनिक अर्ध सैनिक सेल खामगाव यांच्या प्रयत्नांनी व महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर यांच्या निर्देशानुसार तथा म. रा. परिवहन खामगांव आगर डेपो मॅनेजर संजय अकोत यांचे आदेशानुसार खामगाव ते माहूर गढ या बसचे पूजा अर्चना करून वाहक, चालक यांना श्याल श्रीफळ देऊन बसला रवाना करण्यात आले. यावेळी स्वाती तांबटकर, सरला तिजारे, मोहिनी पाटील, आगर कंट्रोलर गजानन सोनोने, दलाल, बोहरपी हे उपस्थित होते. ही बस खामगाव, शेगाव, बाळापूर, वाडेगाव, पातूर, मेडशी, मालेगाव, वाशिम, अनशिंग, पुसद व माहूर या मार्गाने माहूरला पोहोचेल. दररोज दुपारी दोन वाजे दरम्यान खामगाव वरून माहूरला निघेल व माहूरवरून सकाळी ६ वाजता निघेल व दुपारी १२ वाजता खामगाव येथे पोहचेल. या एसटी बसचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

0 9 5 3 2 4
Users Today : 50
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *