मलकापूर:-तालुका प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात जवळपास २० लाख नागरिकांच्या घरकुलांचे स्वप्न पूर्णपूर्तीचा संकल्प केला आहे. मलकापूर तालुक्याला ४ हजार घरकुलांचे उद्दिष्ट आहे. नागरिकांना आपल्या हक्काच्या घरात सण, उत्सव, दिवाळी साजरी करता यावी, यासाठी पावसाळ्यापूर्वीच घरकुलांचे बांधकाम पूर्ण करा, असे प्रतिपादन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार चैनसुख संचेती यांनी येथे केले.डॉ. हेडगेवार भवनात आयोजित वार्षिक आमसभा व सरपंच मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सभापती संजय काजळे, उपसभापती अर्जुन नागोराणे, खविसंचे अध्यक्ष कृष्णा खापोटे, तहसीलदार राहुल तायडे, सहायक गटविकास अधिकारी संदीप नारखेडे, यश संचेती, शैलेंद्रसिंह राजपूत, ज्ञानदेव वाघोदे, तसेच एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक हेमराज कोळी, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घुगे साहेब, सहायक पोलीस निरीक्षक संदीप काळे, सहायक पोलीस निरीक्षक गजानन कौलासे, तालुका कृषी अधिकारी सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी जैन उपस्थित होत्या.
यावेळी २०२४-२५ मधील विविध विभागातील विकासकामांचा आढावा घेण्यात आला. २०२५-२६ च्या कामकाजाची रुपरेषा ठरविण्यात आली. प्रास्तविक बीडीओ वेदिका सजगाने यांनी केले. सभेसमोर कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, स्वच्छ भारत अभियान, घरकुल विभाग, बांधकाम विभाग, पंचायत विभाग, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, तसेच पाणीटंचाई याबाबतीत सर्व विभागांचा सखोल आढावा घेण्यात आला. तसेच वरील सर्व विभागांवर सभेत आलेल्या विविध सूचना, प्रतिक्रिया यावर संबंधित विभागप्रमुखांनी सविस्तर माहिती व समर्पक उत्तरे देऊन सभेचे समाधान केले.संचेती म्हणाले, यापुढे सुद्धा आपला तालुका कोणत्याही विषयात मागे राहणार नाही. पंचायत समितीच्या सर्व योजना समाजातील सर्व वंचित पात्र गरजू घटकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, सोबतच प्रशासनाला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना सभेत केल्या. आमसभेला बांधकाम उपविभाग, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग नांदुरा, लघु पाटबंधारे मृद व जलसंधारण विभाग, भूमी अभिलेख विभाग मलकापूर तसेच सरपंच, शिक्षक मुख्याध्यापक, ग्रामपंचायत अधिकारी व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
Users Today : 50