सोमपुरी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला गुरुवारपासून प्रारंभ

Khozmaster
3 Min Read

वर्दडी बुद्रूक:-विशेष प्रतिनिधी 

गुरूवर्य सोमपुरी महाराजांच्या १५६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह तसेच ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सह शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याला गुरूवार २७ मार्च पासून ग्रामस्थांच्या वतीने प्रारंभकरण्यात येणार आहे व ३ एप्रिल रोजी सकाळी काल्याचे व रात्री पुण्यतिथीच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.
मागिल ४३ वर्षांपासून परंपरेनुसार यंदाही वर्दडी सह पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गुरूवर्य सोमपुरी महाराजांच्या १५६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांसह भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दैनंदिन कार्यक्रमांमध्ये २७ मार्च ते ३ एप्रिल पर्यंत सकाळी ४ ते ६ काकडारती, ६ ते ७ विष्णू सहस्रनाम, ७ ते ११ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, ११:३० ते १२:३० गाथा भजन, दुपारी १ ते ४ कथा प्रवक्ते हभप वैष्णवदास भिकाजी महाराज मोठे यांच्या रसाळ वाणीतून संगीत शिवमहापुराण कथा संपन्न होणार आहे. सायंकाळी ५ ते ७ हरिपाठ व रात्री विविध महाराजांचे किर्तन होणार आहे. २७ मार्च रोजी हभप दत्तात्रय महाराज माळवंडीकर बुलडाणा, २८ मार्च रोजी हभप विशाल महाराज खोले मुक्ताईनगर, ९ मार्च रोजी हभप अमृत महाराज जोशी बीड, ३० मार्च रोजी हभप अकृर महाराज साखरे बीड, ३१ मार्च रोजी हभप प्रकाश महाराज जवंजाळ चिखली, १ एप्रिल रोजी हभप पुरूषोत्तम महाराज पाटील चिखली, २ एप्रिल रोजी हभप अनिल महाराज पाटील बार्शी व ३ एप्रिल रोजी सकाळी ११ ते १ दरम्यान रामायणाचार्य हभप सोपान महाराज शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. कीर्तनासाठी शिवाजी महाराज काकडे, अनिल महाराज जाधव, ज्ञानेश्वर महाराज खांडवे, नामदेव महाराज आघाव, रोहन महाराज भिशे सहकार्य करणार आहेत. ३ एप्रिल रोजी सकाळी सोमपुरी महाराज पुण्यतिथी निमित्ताो शिवपुरी महाराज व सोमपुरी महाराजांच्या समाधीला दुग्ध अभिषेक घालून विधीवत पूजन करण्यात येईल व तसेच काल्याच्या कीर्तनानंतर दुपारी ३ वाजता शिवपुरी महाराज संस्थान अंतरवाला ता.जि. जालना व भोसा, ब्राम्हण सोयंदेव तसेच देवखेड येथून सोमपुरी महाराज पालखीचे आगमन व टाळ मृदंगाच्या जयघोषात स्वागत व त्यांनतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. पुण्यतिथी महोत्सवानिमित्त ३ एप्रिल रोजी रात्री ८:३० ते १०:३० हिंदूप्रसारक हभप पांडुरंग महाराज शितोळे शास्त्री आळंदी देवाची यांचे कीर्तन होणार आहे. या सप्ताहात अनेकांचा आर्थिक हातभार लागणार असून १६ अन्नदात्यांकडून अन्नदान होणार असून महाप्रसादाची २५ ते ३० क्विंटलची महापंगत ग्रामस्थांच्या सार्वजनिक माध्यमातून होत आहे. भजन सम्राटांचे चक्री भजन दररोजच्या किर्तनानंतर रात्री भजन गंधर्व हरिकिशन बुवा बीडकर, एम संगीत अलंकार सतीश राठोड, भजन सम्राट उल्हास महाराज तुपेकर, संगीत अलंकार तुळशीराम दाभाडे, संतोष वाघ, कृष्णा पोहेकर, यासह अन्य भजन सम्राटांची भजन सेवा होणार आहे. ४ एप्रिल रोजी सकाळी ४ वाजेनंतर उपस्थित सर्व पालख्यांची ग्रामप्रदक्षिणेदरम्यान गवळणी व भारूडांचा कार्यक्रम होणार आहे. या सप्ताहातील सर्व कार्यक्रमासंह महाप्रसाद व ज्ञानदानाचा भाविकांनी आवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन सोमपुरी महाराज संस्थान व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

0 9 5 3 2 6
Users Today : 52
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *