विधिसेवा महाशिबिरात महावितरणच्या विविध योजनांचा जागर न्या. अनिल किलोर यांनी दिली माहिती स्टॉलला भेट

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी 

शहरातील सहकार विद्या मंदिर येथे आयोजित विधी सेवा महाशिबिरात सर्वच शासकीय विभागाप्रमाणे महावितरणने लावलेल्या माहिती स्टॉलला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती (नागपूर खंडपीठ) अनिल किलोर आणि अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलडाणा मा. न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांनी भेट दिली आणि महावितरणच्या विविध योजनांची माहिती घेतली. यासाठी तयार करण्यात आलेल्या पोस्टर्स, पॉम्प्लेट आणि पुस्तिका या प्रचार साहित्याची पाहिणी केली. यावेळी जिल्हाधिकारी किरण पाटील तसेच पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनीही भेट देत माहिती घेतली. महावितरणकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभवीज ग्राहक व शेतकऱ्यांना मिळावा यासाठी बुलडाणा येथे आयोजित विधी सेवा महाशिबिरात अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके आणि कार्यकारी अभियंता बद्रीनाथ जायभाये यांच्या मार्गदर्शनात आणि कार्यकारी अभियंता मंगलसिंग चव्हाण यांच्या पुढाकाराने माहिती स्टॉल लावून विविध योजनांची माहिती देण्यात आली. वीज ग्राहकांचे विजबिल शुन्य करणारी प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेत ७८ हजार रूपयापर्यंत अनुदान देण्यात येत आहे. तसेच मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत योजनेत अनुसूचित जाती व जमाती करीता ९५ टक्के आणि इतरांना ९० टक्के अनुदान आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मुळे शेतकऱ्यांना दिवसा विजेचे स्वप्नपूर्ण होणार असून कायम स्वरूपी वीज पुरवठा खंडित वीज ग्राहकांना व्याज व विलंब आकारात संपूर्ण माफीसह सहा हप्त्यात वीज बिल भरून थकबाकीमुक्तीची संधी आहे, अश्या विविध योजनांची या स्टॉलच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.यावेळी महावितरणच्या माहिती स्टॉलला विविध क्षेत्रातील मान्यवर आणि हजारो शेतकरी व वीज ग्राहकांनी भेट देत माहिती घेतली. उपकार्यकारी अभियंता विनोद गुबे, उपकार्यकारी अभियंता डिएललांबट, सहायक अभियंता निंबाळकर, सहाय्यक लेखापाल मुंडलिक तसेच शहर आणि ग्रामीण वितरण केंद्रातील कर्मचारी यांनी महावितरणच्या योजनांची माहिती दिली.

0 9 5 3 2 6
Users Today : 52
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *