शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचवा : आ. संचेती

Khozmaster
1 Min Read

नांदुरा:-तालुका प्रतिनिधी 

शासन व लोकातील दुवा म्हणून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासनाच्या कृषी, शैक्षणिक व आरोग्य इत्यादी विभागाशी संबंधित विविध योजना मतदार संघातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन आमदार चैनसुख संचेती यांनी केले.स्थानिक हरिभाऊ पांडव मंगल कार्यालयात २३ मार्च रोजी नांदुरा पंचायत समितीची वार्षिक आमसभा व सरपंच मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रारंभी विविध विभागांच्या अहवालाचे वाचन करण्यात आले. प्रास्ताविक गटविकास अधिकारी भारत हिवाळे व संचालन विजय सोनाग्रे तर आभार प्रदर्शन प्रशांत जामोदे यांनी केले. यावेळी विचार पिठावर माजी जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती बलदेव चोपडे, शिवाजीराव पाटील, गजानन चरखे, ज्ञानेश्वर ढोले, अनिल इंगळे, संदीप निमकर्डे आदी उपस्थित होते. माटोडा येथे चवथी पर्यंत वर्ग असून तिन महिन्यापासून एकच शिक्षिका आहे. चार वर्गात एकूण ६२ विद्यार्थी आहेत. माटोडा येथे तत्काळ प्रभारी शिक्षक देण्याचे अध्यक्षांनी गटशिक्षणाधिकारी यांना सूचना केली. जलजीवन मिशन ठेकेदार आकाश देशमुख यांच्या कडील काम काढून घेऊन पर्यायी व्यवस्था करण्याची सूचना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे झाल्टे यांना यावेळी केली.

0 9 5 3 2 6
Users Today : 52
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *