मलकापूर:-तालुका प्रतिनिधी
अखिल भारतीय कुणबी मराठा वधू-वर सुचक मंडळ मलकापूर यांच्या वतीने २३ मार्च रोजी उपवर युवक-युवती व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन स्थानिक मराठा मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते.यावेळी अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष शिवागोंडे हे होते. तर उद्घाटक म्हणून अॅड. साहेबराव मोरे हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथीमध्ये विनोद सोनवणे, राजा कऱ्हाळे, बी. सी. महाजन, प्रविण काने, मनोज सोनुने, ज्ञानेश्वर भगत, किसन कंकाळे, मंगला श्रीकृष्ण पाटील, राजेश मुंगळे, हेमंत रिंढे, अजय टप, जगन्नाथ जाधव, सुभाष मोरे, बाळू ढोले, सुभाष गवळी, कल्पना ढोरे, सुवर्णा गोंड, निवृत्ती गावंडे, रविंद्र जाधव, ज्ञानदेव हिवाळे, शुभम उगले, बुलढाणा जिल्हाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे आयोजक अमोल टप यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मानचिन्ह व शाल, पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. तर या आयेजित परिचय मेळाव्याप्रसंगी २८८ युवक व ९६ मुलींनी आपला परिचय देत बायोडाटा हा आयोजन समितीकडे जमा केला. संचलन व आभार प्रदर्शन श्रीकृष्ण भगत यांनी केले. कार्यक्रमाला युवराज माताडे, शरद मोरखेडे, सुरज टप, अमित हिंगणकर, रोहीत डाके, रामदास रोठे, सचिन कापसे, गोपाल गोरे, अमोल ढेकळे यांचेसह अखिल भारतीय कुणबी मराठा वधू-वर सुचक मंडळ मलकापूरच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 52