मासरूळ:-विशेष प्रतिनिधी
उन्हाळ्यात अभयारण्यातील जंगलासह डोंगरांना आगी लागतात की लावण्यात येतात, याबाबत वनविभागने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.विदर्भाला लागून अजिंठा लेणी सह्याद्री पर्वत रांगा असलेल्या बुलढाणा तालुक्यात पश्चिम घाट अभयारण्यात मढ, गिरडा, गुम्मी, शेकापूर, जामठी, तराडखेड या अभयारण्याल २२ मार्च २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता आग लागल्याने अनेक वृक्ष, झुडुपे, वनस्पती, कीटक, सस्तन प्राणी, पक्षी जखमी होवून मृत झाले. उन्हाळा सुरू झाल्यानंतर जंगल परिसरातील शिकारी, निसर्ग कंटक मुद्दाम या आगी लावत असतात. त्यामुळे फुकटचे लाकूड मिळत असून जंगल विभागात शेतीसाठी अतिक्रमण करणे, मोर, तितर, घोरपड, ससे, रानडुकर व इतर सस्तन प्राण्यांच्या शिकारीसाठी आग लावली जाते, असे निरीक्षण नोंदविले गेले आहे. निसर्ग कंटक, शिकारी या लोकांसाठी या आगी लावणे खूप सोपे असते, परंतु निसर्गाची पुढील पंचवीस वर्षे भरून न येणारी हानी होत असते. त्यामुळे आग लावणाऱ्या कंटक लोकांचा शोध घेऊन वन विभागाने या लोकांवर कडी नजर ठेवण्याची गरज आहे.
Users Today : 52