समर्थ कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे बँकिंग क्षेत्रात घवघवीत यश

Khozmaster
1 Min Read

देऊळगाव राजा:-तालुका प्रतिनिधी

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत समर्थ कृषी महाविद्यालय सिंदखेडराजाच्या विद्यार्थ्यांनी बँकिंग क्षेत्रात घवघवीत यश संपादन केले आहे. महाविद्यालयाचा मंगेश हाडे असिस्टंट मॅनेजर, ज्ञानेश्वर गोटे असिस्टंट मॅनेजर, गोपाल घुबे क्लर्क, बाबासाहेब खार्डे हेड सिनियर कस्टम सर्विस यांची विदर्भ कोकण ग्रामीण बँकमध्ये निवड करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांनी बँकिंग क्षेत्राची तयारी करताना परीक्षा अभ्यासक्रम, कटऑफ आणि अडचण पातळीची लक्षात घेऊन रणनीती आखून अभ्यास करणे महत्त्वाचे आहे, अशी भावना प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांनी व्यक्त केली. या चारही विद्यार्थ्यांचा गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा नंदाताई कायंदे, संस्थेचे सचिव सतीश कायंदे, सिंदखेडराजाचे आ. मनोज कायंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे, प्रा. योगेश चगदळे, प्रा. देवानंद नागरे, प्रा.मंगेश धांडे, प्रा.विकास म्हस्के, प्रा.अनुप वानखेडे आदींनी सत्कार केला.

0 9 5 3 2 6
Users Today : 52
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *