मोताळा:-तालुका प्रतिनिधी
तालुक्यामध्ये १०६ गावे असून प्रत्येक गावांमधील पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झालेले आहे. पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना गोरगरीब लोकांसाठी असल्यामुळे त्यांना त्रास देऊ नका. कामे करताना अधिकाऱ्यांना अडचणी येत असतील माझ्या कानावर घालाव्या जेणेकरुन त्याचा शासनस्तरावर पाठपुरावा करुन सोडविणे शक्य होतील.अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य द्यावे, असे निर्देश आ. संजय गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना दिले.
पंचायत समितीच्या प्रांगणात २३ मार्च रोजी २०१८ नंतर प्रथमच ७वर्षानंतर शासनाच्या निर्णयानुसार वार्षिक आमसभा तथा सरपंच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना आ.गायकवाड बोलत होते. गटविकास अधिकारी भानुदास गिते यांच्या हस्ते आ. संजय गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आ. संजय गायकवाड यांनी पंचायत समिती अंतर्गत बांधकाम विभाग, घरकुल विभाग, ग्रामपंचायत विभाग, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, स्वच्छ भारत मिशन, एकात्मिक बाल विकास, पाणीपुरवठा विभाग, शिक्षण विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभागासह इतर विभागाचा आढावा घेतला. पुढे बोलताना आ. गायकवाड म्हणाले की, ३-४ वर्षापासून जिल्हा परिषद शाळांमध्ये सीबीएससी पॅटर्न लागू झाला पाहिजे, अशी मागणी लावून धरल्याने ती शासनाने मंजूर केल्यामुळे शिक्षणाचा दर्जा वाढून ग्रामीण भागातील विद्यार्थी हा स्पर्धेमध्ये टिकेल. त्याला भविष्यामध्ये रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. सातवर्षाच्या कालावधीनंतर ही आमसभा होत असल्यामुळे ही आमसभा वादळी होईल असे वाटत होते, मात्र आ. गायकवाड यांनी सर्व विभागाचा योग्य पद्धतीने आढावा घेऊन संबंधित गावातील सरपंच, पदाधिकारी तसेच अधिकारी यांनी जास्त कामे करण्याचे निर्देश दिले. प्रास्ताविक बीडीओ भानुदास गिते यांनी तर आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी अशोक काळे यांनी केले. या कार्यक्रमास गटविकास अधिकारी भानुदास गीते, धा. बढे ठाणेदार नागेश जायले, बोराखेडी पोस्टेचे एपीआय बालाजी शेंगेपल्लू, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख शरदचंद्र पाटील, महिला आघाडी तालुकाप्रमुख अंजनाताई खुपराव, बाळाभाऊ नारखेडे, नितीन सुपे, मारोती कोल्हे, प्रदीप जैन, अॅड. विजयसिंग राजपूत, सुखदेव शिपलकर, स्वीय सहायक ज्ञानेश्वर वाघ, सचिन हिरोळे, अनिता झंवर, ग्रामविस्तार अधिकारी अशोक काळे, राजेंद्र तायडे, विस्तार अधिकारी गवई, धन दर साहेब, विविध गावचे सरपंच, ग्रामसेवक, संबंधित खात्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.
Users Today : 52