मासरुळ:-विशेष प्रतिनिधी
धाड येथील ज्ञानदेवराव बापू दांडगे विद्यालयात मातृ-पितृदिन तसेच आजी-आजोबा व शिक्षक-पालक मेळावा उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरीभाऊ विसपुते तर प्रमुख उपस्थितीत उपप्राचार्य प्रविण चव्हाण, शिक्षिका राजपूत, बोर्डे, शिंदे ह्या होत्या. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपप्राचार्य अमोल जाधव यांनी मातृ-पितृ पूजनाचे महत्व सांगितले. आजी-आजोबा हेच खरे संस्काराचे व संस्कृतीचे विद्यापीठ आहे, असे प्रतिपादन प्राचार्य संतोष डवले यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आरोग्य व विविधप्रगती विषयी पालकांशी सविस्तर चर्चा करून वर्षभराचा आढावा यनिमित्ताने त्यांनी दिला. बदलत्या समाज जीवनात ज्येष्ठांच्या मार्गदर्शन व अनुभवाने समाज पुढे जाईल, असे विचार याप्रसंगी मान्यवरांच्या भाषणातून व्यक्त झाले. मातृ-पितृ पूजनासाठी इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी आरतीचे ताट व हार तयार केले होते. काही विद्यार्थ्यांनी घरीच पालकांचे पूजन केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपप्राचार्य अमोल जाधव यांनी केले.
Users Today : 63