आठवडी बाजार परिसरात घाणीचे साम्राज्य

Khozmaster
1 Min Read

लोणार:-तालुका प्रतिनिधी 

शहरात सोमवारी भरत असलेला आठवडी बाजारात घाणीच्या साम्राज्य पसरले आहे. वातावरण बदलामुळे पहिलेच तापाच्या रुग्णात वाढ होत असून या घाणीमुळे विक्रेत्यांसह परिसरातील नागरिकांचे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. बाजार भरण्याआधी म्हणजे फक्त रविवारी थातूरमातूर साफसफाई होत असल्याने बाजार परिसरात दुर्लक्ष होत असल्याची व्यापाऱ्यांकडून तक्रार होत आहे.या परिसरात सकाळी भाजीपाला लिलाव देखील होत असतो. मात्र तो एका ठराविक जागेतच होत असल्याने इतर भागातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असते. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरते. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे प्रमाण देखील वाढले आहे. सदर आठवडी बाजाराचे दोन्ही गेट तुटलेले असून त्यामूळे प्रचंड प्रमाणात घाण या ठिकाणी होत आहे. नगर पालिका प्रशासन सक्तीने बैठक कर घेते. परंतु, सुविधा देत नाही. वसुली ठेकेदारा कडून व्यापारी वर्गाकडून मोठ्यया प्रमाणात कर वसुली करतो.मात्र, सुविधांचा पुरविल्या जात नसल्याची तक्रार व्यापारी करत आहे. त्याचप्रमाणे परिसरात विक्रेत्यांना बसण्यासाठी नगरपालिकेने लाखों रुपये खर्च करून टिन शेड व बाजार वटे व्यापाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले. परंतु, नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे परिसराची कचरा डेपोसारखी अवस्था झाल्याने व्यापारी टिनशेडच्या परिसरात जमीनीवरच आपली दुकाने लावतात.तर काही रस्त्यावर आपले दुकान मांडत आहेत. याकडे नगरपालिका प्रशासन व मुख्याधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देण्याची मागणी होत आहे.

0 9 5 3 3 7
Users Today : 63
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *