काँग्रेससह उबाठाच्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी 

शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालयात आ. संजय गायकवाड यांच्या कार्यक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसच्या माजी नगरसेविका प्रमिला लक्ष्मण गवई यांच्यासह उबाठाचे मोताळा किसानसेना तालुकाप्रमुख सुधाकर सुरडकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते विजय अंभोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये २३ मार्च रोजी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव येवले, भैय्या जयस्वाल यांच्यासह असंख्य मान्यवरांची उपस्थिती होती. पक्षप्रवेशामध्ये प्रामुख्याने रुपेश गवई, प्रशिक मोरे, सलमान शहा, हसमुख पाटील, कुंदन झिने, नीलेश जाधव, आदित्य मगरे, दीक्षांत नवघरे, आदेश राठोड, प्रवीण गायकवाड, योगेश जाधव, रोशन ठाकरे, किशोर इंगळे, मंगेश इंगळे, प्रेम भोसले, संदेश वानखेडे, लखन मोरे, सिद्धार्थ पवार, रोहित किटके, करण इंगळे, आनंद गवई, हर्षल खरे, सुमित गवई, रवींद्र हिवाळे, नितीन शर्मा यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.

0 9 5 3 3 8
Users Today : 64
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *