लोणार:-जिल्हा प्रतिनिधी
लोणार शहरातील राम नगर येथे १९ मार्च रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीची बैठक पार पडली. यावेळी सर्व समाज बांधवांच्या वतीने समितीच्या अध्यक्षपदी प्रा. सुदन अंभोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.प्रारंभी सर्वांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अगदी शांततेत आनंदाने पार पडणार असल्याचे सांगितले. अनेकांनी जयंती ही चांगल्या प्रकारे कशी साजरी करण्यात यावी, या बाबत बैठकीत आपले विचार मांडले. या बैठकीला समिती अध्यक्ष प्रा. सुदन अंभोरे, प्रा. खुशालराव गवई, प्रा. डॉ. के. बी. इंगळे, प्रा. रवींद्र खरात, प्रा. सुदन कांबळे, माजी नगरसेवक छगन कंकाळ, प्रकाश नरवाडे, सुखदेव मोरे, गजानन तुरूकमाने, संजय शिंगणे, सुभाष डोंगरदिवे, एस. बी. अवसरमोल, एन. के. अंभोरे, सुनील खरात, साहेबराव वानखडे, भास्कर मोरे, अशोक खरात, उद्धवराव शेजुळ, सोपान वाठोरे, सिद्धार्थ भालेराव, डॉ. प्रवीण गवई, राजू मोरे, रवी इंगळे, गजानन मोरे, ईश्वर कांबळे, बच्चू अंभोरे, विजय सरकटे, महेंद्र मोरे, अभिजित कांबळे, सिद्धार्थ गायकवाड, प्रसेनजीत इंगळे, अभय मुळे, महेंद्र भालेराव, योगेश मोरे, सुदन अंभोरे, रुपेश नरवाडे, सिद्धार्थ मुळे, सयाजी वाठोरे आदी उपस्थित होते.
Users Today : 63