ढोरवी येथे ग्रामसभेत पोखरा समिती गठित

Khozmaster
1 Min Read

मलकापूर पांग्रा:-विशेष प्रतिनिधी 

मलकापूर पांगरा येथून जवळ असलेल्या ढोरवी २४ मार्च २०२४ रोजी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत पोखरा समिती स्थापन करण्यात आली.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन या प्रकल्पांतर्गत विदर्भातील अकरा जिल्ह्यातील ४२८४ गावे समाविष्ट करण्यात आलेले असून मलकापूर पांगरा व इथून जवळ असलेल्या डोरव्ही हे गाव सुद्धा समाविष्ट करण्यात आले यावेळी विशेष ग्रामसभा आयोजित करून समितीची स्थापना करण्यात आली. यावेळी गावचे कृषी सहाय्यक खंडू चौधरी मार्गदर्शनपर सूचना दिल्या.तसेच सरपंच नितीन पवार व उपसरपंच आशिष मुरकुट यांच्या मार्गदर्शनाखाली पोखरा समितीची स्थापना करण्यात आली. त्यात पदसिद्ध अध्यक्ष सरपंच नितीन पवार, पदसिद्ध सदस्य आशिष मुरकुट, ग्रामपंचायत सदस्य कल्पना मुरकुट, दिपाली मुरकुट, राजेंद्र मुरकुट, उद्धव शेळके, महिला सीमा लिंगशे, सहकारी संस्थेचे अध्यक्ष आबाराव मुरकुट, शेतकरी गट संस्थापक रमेश पिंपळे, महिला बचत गट प्रतिनिधी सुनंदा पवार, कृषी पूरक व्यावसायिक शेतकरी महिला किरण मुरकुट, मालता शिंदे, रेखा मुरकुट, शिवाजी लिंगसे, भगवान मुरकुट, ज्योती लिंगशे, रामगीता मुरकुट यांचा समावेश आहे. यावेळी उपस्थित कृषी पर्यवेक्षक रेखा वाघमारे, ग्रामविकास अधिकारी जयश्री मोरे, ग्राम महसूल अधिकारी पंकज देशमुख, संदीप मुरकुट, गजानन मुरकुट, उद्धव शेळके, आबाराव मुरकुट, भागवत मुरकुट, संजय मुरकुट, दीपक मुरकुट, धनंजय मुरकुट, शिवानंद शेळके, ज्ञानेश्वर शिंदे, बळीराम शिंदे, निखिल मुरकुट, शिवाजी लिंगशे, सुनंदा पवार आदी उपस्थित होते.

0 9 5 3 3 8
Users Today : 64
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *