स्वदेशी जीवन शैली, स्वदेशी उद्योग उभारणी ही हुतात्म्यांना आदरांजली ठरेल : प्रा. जोशी

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी 

संपन्न भारत, समर्थ भारत, श्रेष्ठ भारत निर्माण करण्यासाठी कुटुंब प्रबोधन चळवळ, समरसता भाव, पर्यावरण संरक्षण अभियान, स्वदेशी जीवन शैली, स्वदेशी उद्योग उभारणी, स्वावलंबी, आत्मनिर्भर, युवाशक्ती भारतीय नागरिकांची आद्य कर्तव्ये या मूलभूत मंत्राचा प्रत्यक्ष जीवनात अवलंब करण्याचा शुभ संकल्प करणे, हेच भारतीय हुतात्म्यांना खरे अभिवादन ठरेल, असे प्रतिपादन प्रा. विजयराव जोशी यांनी केले.स्थानिक गर्दै वाचनालय स्थित बुलढाणा जिल्हा सृजन रोजगार केंद्र सभागृहात २३ मार्च रोजी सकाळी ८ ते ९ या वेळेत स्वावलंबी भारत अभियान बुलढाणा आणि शतकोत्तर गर्दे वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हुतात्मा दिन आणि उद्यमिता प्रोत्साहन संमेलन समारंभ प्रसंगी मार्गदर्शन करीत होते. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष गर्दे वाचनालयाचे उपाध्यक्ष बाबासाहेब वरणगांवकर, प्रमुख अतिथी प्रवीण चिंचोलकर, विदर्भ प्रांत सहसंयोजक शिवाजी भालतिलक, प्रामुख्याने उपस्थित होते. या सोहळ्याचा प्रारंभमान्यवरांच्या हस्ते भारतमाता, हुतात्मा भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन, पुष्पमाला अर्पण करून, अभिवंदनाद्वारे झाला. प्रसंगी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. उपरोक्त कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय शिवाजीराव भालतिलक, आभार व संचालन संदीप जाधव यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी गोपाळ देवकर, विनय जाधव, अतुल राजनकर, अजित गुळवे आदिनी सहकार्य केले.

0 9 5 3 3 7
Users Today : 63
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *