संग्रामपूर:-तालुका प्रतिनिधी
सातपुडा पर्वताच्या कुशीत अंबाबरवा अभयारण्यातील सोनाळा वनपरिक्षेत्र दुर्गम भागात शासकीय सेवेत असेलेल्या वनरक्षक कपिल मोरे यांना २१ मार्च रोजी जागतिक वनदिनानिमित्त वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते अमरावती विभागातून सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले.सातपुड्यात सोनाळा वनपरीक्षेत्र अंतर्गत अंबाबरवा अभयारण्यात वनसेवेतील प्रभावी कामाबाबत शासनाने सुवर्ण पदक घोषीत केले आहे. त्यामध्ये अंबाबरवा अभयारण्यात सेवा देणाऱ्या शेतकरी कुटुंबात जन्मलेले वनरक्षक कपील मोरे अमरावती विभागात सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले आहेत. महसुल व वनविभागाने सन २०२२-२३ साठी ही निवड करण्यात आली आहे. वनविभागाच्या पदक वितरण सोहळ्यामध्ये जागतिक वन दिनानिमित्त वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते वनविभागाचा पदक वितरण सोहळा ऑडिटोरियम, सिडको कन्वेंशन सेंटर, सेक्टर-३०, वाशी, नवी मुंबई येथे संपन्न झाला. यावेळी महसूल व वनविभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक (वनबल) शोमिता बिस्वास, एम. श्रीनिवास रेड्डी, एम. श्रीनिवास राव, संजय गौर, विवेक खांडेकर, ऋषिकेश राजन, एस.व्ही रामराव, के. प्रदीपा, एन. आर प्रवीण आदी उपस्थित होते.
Users Today : 63