खामगाव:-तालुका प्रतिनिधी
येथील नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांनी शहरातील अतिक्रमणा विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून शहरातील अतिक्रमण धारकांनी आपली अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावी, अन्यथा कारवाईला सामोरे, असे आवाहन त्यांनी केले आहे.याबाबत मुख्याधिकारी डॉ. शेळके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, खामगाव नगर परिषदेच्या वतीने खामगाव शहरात अतिक्रमण निर्मुलनाची विशेष मोहीम २१ मार्च रोजी राबविण्यात आली. यामध्ये मुख्यत्वे शहरातील नाना नानी पार्कच्या बाजुच्या रस्त्यावरील व शहर पोलीस स्टेशन गांधी बगीच्या समोरील रस्त्यावरील ३५ अतिक्रमणे अतिक्रमण पथकाद्वारे हटविण्या आली आहेत. तसेच अतिक्रमण हटविण्याची मोहीम अशीच सुरु राहणार असून टप्पा टप्पाने शहरातील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. असे डॉ. प्रशांत शेळके, मुख्याधिकारी नगर परिषद यांनी कळविलेले आहे.तसेच अतिक्रमणधारकांनी नुकसान व कार्यवाही टाळण्यासाठी स्वतःहून अतिक्रमणे काढून घ्यावीत, असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे. आता त्यांच्या आवाहनाला किती प्रतिसाद मिळतो हे बघावे लागणार आहे. न. प. मालकीच्या जागांची विना परवाना नोटरी करू नये : मुख्याधिकारी खामगाव नगर परिषद हद्दीतील नगर परिषद मालकीच्या असलेल्या जागांची, ईमल्याची नोटरी नगर परिषदेच्या परवानगी विना केल्याचे नगर परिषदेच्या निर्देशास आलेले आहे. तरी खरेदी विक्री व मालमत्ता हस्तांतरण व्यवहाराशी निगडीत यंत्रणा, नोटरी करणारे अधिवक्ता यांनी न. प. खामगाव मालकीच्या जागांचे तसेच ईमल्याची नोटरी, खरेदी विक्री व्यवहार नगर परिषद खामगावच्या परवानगी शिवाय करण्यात येवू नये तसेच करण्यात आलेले सर्व नोटरी, खरेदी विक्री व्यवहार रद्द करण्यात यावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. शेळके यांनी केली आहे.
Users Today : 63