मलकापूर:-तालुका प्रतिनिधी
स्वैराचार करणाऱ्या कुणाल कामरावर तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे यांनी दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमराज कोळी यांच्याकडे केली आहे.दसरखेड ठाणेदारांना देण्यात आलेल्या निवेदनात नमुद आहे की, कॉमेडियन कुणाल कामरा या स्टँडअप कॉमेडियनने विडंबनात्मक गाणे गाऊन शिवसेना पक्ष प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवण्याचा गैरप्रकार केला. एवढच नव्हे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गद्दार म्हणुन सुध्दा उल्लेख केला. कुणाल कामरा याने केलेल्या विडंबनात्मक प्रकारामुळे शिवसेना व महाराष्ट्रामध्ये संताप व्यक्त होत आहे. त्याने केलेल्या बेताल विडंबनात्मक गाण्याचा निषेध व्यक्त करीत त्याच्या विरुध्द कलम ३५३ (१) (ब) (सार्वजनिक त्रास देणारी विधाने) आणि कलम ३५६ (२) (बदनामी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी देखील शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे, विभाग प्रमुख सुरेश अहीर, विनोद बोदडे, गजानन धाडे, संदेश शिंदे, सचिन चव्हाण, शुभम देशमुख यांनी केली आहे. दरम्यान, ठाणेदार कोळी यांनी कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
Users Today : 65