सेवाभावी संस्थांच्या सहकार्यानेच देश प्रगतीपथावर : संभाजी ठाकरे

Khozmaster
2 Min Read

हिवरा आश्रम:-विशेष प्रतिनिधी 

सेवाभावी संस्थांचे महत्व इतिहासाला दुर्लक्षीत करता येणार नाही. सर्वसामान्य मानसापर्यंत शासनाला व यंत्रणेला पोहचता येईलच, असे नाही. अशा ठिकाणी जावून चॅरिटी करुन अनेक संस्थांनी सामाजिक व आर्थिक परिवर्तनाच्या लढाईत सहभाग घेतला. अडचणींवर मात करुन या समाजाची मोठी सेवा केली आहे. देशाच्या जडणघडणीत व मानवसेवेत संस्थांचे योगदान मोठे आहे. अशा सर्व सेवाभावी संस्थांच्या सहकार्यानेच देश आज प्रगतीपथावर दिसत आहे, असे विचार अमरावती विभागाचे धर्मादाय सहआयुक्त संभाजी ठाकरे यांनी व्यक्त केले.सामाजिक न्यास नोंदणी कार्यालय (बुलडाणा) च्या वतीने विवेकानंद आश्रमात २४ मार्च रोजी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय विश्वस्त परिषदेत प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बुलडाणाचे सहायक धर्मादाय आयुक्त दु.के. साहू व म.प्र. डवले, आश्रमाचे अध्यक्ष आर.बी. मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, बार असोशिएशनचे अॅड. निखील मिटकरी उपस्थित होते. परिषदेची सुरुवात प्रतिमा पूजन स्वागतगीत व पाहूण्यांच्या स्वागताने झाले. दु.के. साहू यांनी प्रास्ताविकात संस्थेत विश्वस्तांची भूमिका, कर्तव्य तसेच नियम व कायदयाची बांधीलकी ठेवून करावयाच्या कामासंबंधी विश्वस्तांनी जागरुक राहण्याचे आवाहन केले. विवेकानंदांनी सन्याशांना आपल्या दिव्य साधनेचा, प्रज्ञेचा वापर मानवसेवेसाठी करुन समाजाला आरोग्य, शिक्षण, अन्न, वस्त्र, निवारा, सामाजिक एकता या गरजांच्या पूर्तीसाठी लढण्याचे आवाहन केले होते, त्या विचारांची कास धरुन शुकदास महाराजांनी विवेकानंद आश्रमाची मुहूर्तमेढ रोवून मानवकल्याणाचे कार्य सुरु केल्याचे संतोष गोरे यांनी सांगीतले.या विश्वस्त परिषदेत ३५० विश्वस्त हजर होते. विश्वस्तांना.श्री.मार्गदर्शन करण्यासाठी अॅड. श्रीकृष्ण ढगे, अॅड. राहूल बोरसे, अॅड. आनंद चेकेटकर, ऑडिटर अॅड वरद सावजी, अॅड. मनोज मुणोत व तणावमुक्तीसाठी सहजयोग समितीचे मिलींद पाचपोळ यांना विशेष निमंत्रीत केले होते. कार्यक्रमाला अॅड. अरुण निकमसह अनेक वकील तथा विविध संस्थेचे अध्यक्ष सचिव तथा अमरावती कार्यालयाचे अधिक्षक विजय चव्हाण, बुलडाणाचे नि.पु. करलुके व उ.ब. निर्मल व कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा. गाढे व प्रा. अनुराधा जाधव यांनी तर आभार सहायक धर्मादाय आयुक्त म.प्र.डवले यांनी मानले.

0 9 5 3 3 9
Users Today : 65
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *