सक्रिय सदस्यता नोंदणीसह बुथरचना कार्याची आढावा बैठक

Khozmaster
1 Min Read

लोणार:-तालुका प्रतिनिधी 

स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे भाजपा संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियानांतर्गत सक्रिय सदस्यता नोंदणी व बुथरचना कार्याचा आढावा बैठक उत्साहात पार पडली.
भाजपा वाशिम जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राजू पाटील राजे यांनी बुथ स्तरावरील संघटनात्मक कामे मजबूत करून स्थानिक पक्ष मजबूत करावा याविषयी मार्गदर्शन केले.
या बैठकीत विविध पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी आगामी निवडणुकीसाठी मार्गदर्शन करून प्रत्येक कार्यकर्त्याला अधिकाधिक सदस्य जोडण्याचे आवाहन केले. लोणार तालुक्यातील बुथनिहाय कार्यकर्त्यांची या बैठकीत निवड करण्यात आली.या बैठकीला लोणार तालुकाध्यक्ष भगवानराव सनाप, भाजपा जिल्हा नेते विजय मापारी, जिल्हा सचिव गजानन मापारी,जिल्हा उपाध्यक्ष अॅड. शिवाजी सानप, लोणार शहराध्यक्ष शुभम बनमेरू, जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष उध्दव आटोळे, विष्णू डोळे, प्रा. नरेद्कुमार सोनुने, प्रवीण धाईत, गोपाल काबरा, गजानन वाघ, डॉ. गणेश सानप, दीपक लोहारे, संदीप कुटे, दिनकर डोळे, कचरू डोळे, गणेश तांगडे, पंढरी मापारी, मारोतराव सुरूशे, केशव देवडे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

0 9 5 3 3 9
Users Today : 65
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *