शिवसेना महिला आघाडीचे जोडे मारो आंदोलन

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी 

कॉमेडीयन कुणाल कामरा याच्या विरुध्द गुन्हा दाखल करुन त्यास अटक करावी, अशी मागणी बुलढाणा जिल्हा महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली असून कामराच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २५ मार्च २०२५ रोजी जोडे मारो आंदोलन करुन निषेध नोंदविण्यात आला. कॉमेडीयन कुनाल कामरा याने विडंबनपर काव्य समाजमाध्यमांवर प्रसारीत केले. त्या काव्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. शिवाय यापूर्वीही त्याने पंतप्रधान यांच्यावरही विडंबन काव्य केले होते. विशीष्ट पक्षाकडून सुपारी घेऊन आमच्या पक्षनेत्यांवर जाणून बुजून विडंबन करण्याचा प्रयत्न केल्या जात असेल तर शिवसेना यापुढे असे प्रकार खपवून
सुपारी प्रियन विडयन करणा-य कामरला जाहीर निवेध घेणार नाही. त्याला जसेच्या तसे उत्तर देण्यात येईल. या विडंबनकार कामरा विरुध्द गुन्हा दाखल करुन त्यास तत्काळ अटक करावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत कुणाल कामरा याच्या प्रतिमेला जोडे मारुन आंदोलन करत निषेध नोंदविला. यावेळी शिवसेना महीला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मायाताई म्हस्के, अंजना खुपराव, कविता गायकवाड, अनिता झंवर, राधाताई फाटे, लताताई चव्हाण, कुमोद पाटील, संगिता बढे, रुपाली मिरगे यांच्यासह महीला आघाडीच्या सदस्या उपस्थित होत्या.

0 9 5 3 3 9
Users Today : 65
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *