बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी
प्रत्येक भावी शिक्षकाने आपली विवेकबुद्धी जागृत ठेवून नवीन शैक्षणिक धोरणांची आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य ठेवले पाहिजे. तसेच नवीन तंत्रज्ञानाला – बळी न पडता आपल्या बुद्धी कौशल्याचा वापर करून उद्याची पिढी घडवण्याचे स्वप्न उराशी बाळगून आपली शैक्षणिक वाटचाल केली पाहिजे. एआय हे तंत्रज्ञान शिक्षकाची जागा कधीच भरून काढू शकत नाही, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एन. बी.चव्हाण यांनी केले आहे. स्थानिक शासकीय अध्यापक विद्यालयात २१ मार्च २०२५ रोजी माजी विद्यार्थ्यांचा = पदवीदान समारंभ, माजी विद्यार्थी ना त ना व पालक मेळावा पार पडला, त्यावेळी प्राचार्य डॉ. चव्हाण बोलत होत्या. यावेळी प्रमुख अतिथी जिल्हा शिक्षक समुपदेशक तथा ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अरविंद शिंगाडे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात शिक्षक म्हणून कार्यरत जरी असले तरी तुमच्यातील विद्यार्थी हा शेवटपर्यंत जिवंत असला पाहिजे, असे आवाहन केले. प्रारंभी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली. यावेळी बीएड व एमएडच्या माजी विद्यार्थ्यांना पदवी देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी काही माजी विद्यार्थ्यांनी देखील आपली मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रा.डॉ. हर्षानंद खोब्रागडे, कार्यक्रमाचे आयोजक प्रा.डॉ. सुनील खडसे, प्रा. प्रेरणा श्रीनाथ, प्रा. भावना काळे, प्रा. अनिल ढगे, ग्रंथपाल प्रा.डॉ. प्रकाश डोंगरदिवे, प्रा. रविकिरण मोरे प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन मोहनीश कुंदेटकर व दीपिका वडोदकर यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय अच्युत मोठे यांनी करून दिला. प्रास्ताविक अनिकेत कंकाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन पूजा कोल्हे यांनी केले. सदर पदवीदान समारंभ तसेच विद्यार्थी व पालक मेळाव्याला आजी-माजी विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते
Users Today : 65