देऊळगाव घुबे:-विशेष प्रतिनिधी
स्थानिक जानकी देवी उच्च माध्यमिक विद्यालायची खो-खोची खेळाडू प्रियंका भानुदास घुबे हिची खो-खोच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
भारतीय खो खो महासंघा मार्फत ओडिसा राज्यातील पुरी येथे महिलांची खो-खो राष्ट्रीय स्पर्धा ३० मार्च ते ४ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आली असून यामध्ये भारतातील सर्व राज्यांचे संघ सहभागी होत आहेत. यामध्ये विदर्भ राज्याचा संघ सहभागी होत असून या संघात प्रियांकाची निवड झाली आहे. आपल्या उत्कृष्ठ कामगिरीच्या बळावर प्रियंकाची निवड झाली असून तिसऱ्यांदा प्रियंका राष्ट्रीय खो-खो स्पर्धा खेळणार आहे. सरावातील सातत्याच्या बळावर प्रियंका उत्कृष्ठ धावक व क्षेत्र रक्षणात पारंगत आहे. प्रियंकाला संजय सावंत यांचे कडून मार्गदर्शन लाभले आहे. या निवडीबद्दल नुकताच देऊळगाव घुबे येथे चिखलीचे नायब तहसीलदार गायकवाड, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शेणफडराव घुबे, सचिव प्रा. उद्धवराव घुबे यांनी तीचा सत्कार केला.
Users Today : 65