बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम विभागात मानधन तत्वावर कार्यरत झेरॉक्सची लाखो रुपयांची बिले आणि मानधन टेंडर क्लर्क तथा प्रथम लिपिक प्रभू गारोळे यांनी जाणूनबुजून अडविल्याचा आरोप करत भादोला येथील गणेश शिंदे या झेरॉक्स ऑपरेटरने बुलढाण्यात २४ मार्चपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. तालुक्यातील भादोला येथील रहिवासी गणेश शिंदे हे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये झेरॉक्स ऑपरेटर म्हणून २०१४ पासून मानधन तत्वावर कार्यरत आहेत. त्यांचे चिंचोले चौकात जिजाऊ झेरॉक्स सेंटर आहे. कार्यालयीन झेरॉक्स काढण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे टेंडर निघाले होते. ते टेंडर गणेश शिंदे यांनी घेतले. त्यानुसार ते झेरॉक्स काढत होते. एप्रिल २०२४ ते मे २०२४ व जून २०२४ या कालावधीमधील झेरॉक्सची बिले कार्यालयाकडे थकली आहेत. देयकांची मागणी करूनही टाळाटाळ केली जात आहे. तसेच आपल्याला धमकावले जात असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला आहे. न्याय मिळत नसल्याने शिंदे यांना उपोषणास्त्राचा आधार घ्यावा लागला आहे. टेंडर काढून दुसऱ्यांना नियमबाह्य दिले,देयके अदा करण्यासाठी केलेल्या मागणीची पूर्तता केली जात नाही म्हणून १ जून २०२४ रोजी तोंडी सूचना देऊन कामावर यायचे नाही, असा दम भरण्यात आला. कार्यालयाच्या आवारात आल्यास जीवाने मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. एवढेच नाही तर टेंडर क्लर्क व प्रथम लिपिक प्रभू गारोळे यांनी आपले टेंडर काढून दुसऱ्यांना दिले. आता हाताला काम मिळत नसल्याने आपल्यावर उपासमारीची वेळ आल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे. काढली अवास्तव बिले गणेश शिंदे यांना कार्यालयातून काढल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी अवास्तव बिले काढली आहेत, असा आरोप करत या प्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.मार्च व मे २०२४ या कालावधीतील मानधनही कार्यालयाकडे थकले आहे. त्याची मागणी केली असता टाळाटाळ करण्यात आली. तसेच खोट्या केसेसमध्ये अडविण्याच्या धमक्या देण्यात आल्या. झेरॉक्सच्या बिलाची रक्कम कार्यालयाकडे थकली आहे. इतरांकडून उसनवारी घेऊन झेरॉक्सकरिता लागणारे साहित्य खरेदी केले आहे. मानधन आणि झेरॉक्सची थकीत देयके न मिळाल्यास नैराश्येपाटी जीवनातून मुक्त होण्याची वेळ येऊ शकते. मला न्याय देण्यात यावा, अशी याचना शिंदे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
Users Today : 65