जिजाऊ स्कूलच्या विद्यार्थ्यांची ग्रामीण पोलीस स्टेशनला भेट

Khozmaster
1 Min Read

खामगाव:-तालुका प्रतिनिधी 

जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांनी २२ मार्च रोजी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला भेट दिली. त्यामुळे पोलीस स्टेशनचा कारभार कशा प्रकारे चालतो व त्यांना कोणकोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, याची सखोल माहिती मुलांना मिळाली. कशाप्रकारे आपल्या कुटुंबापासून दूर राहून आपल्याला देशाच्या सेवेसाठी तत्पर रहावे लागते याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली.खामगांव ग्रामीण पोलिसचे ठाणेदार विजय चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना पोस्को कायदा काय आहे, सायबर गुन्हे कसे घडतात, त्यापासून आपण कसे वाचवू शकतो, याबाबत मार्गदर्शन केले.त्याचबरोबर त्यांनी विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनमध्ये उपलब्ध असलेले रायफल, पिस्तुल अशा वेगवेगळ्या संरक्षण साहित्याची प्राथमिक महिती दिली. कार्यक्रमाच्या वेळी शाळेच्या सचिव सुरेखा गुंजकर, गुंजकर कॉलेजचे प्राचार्य सतिष रायबोले, तसेच शिक्षिका मोरे, ठाकरे, शिक्षक ठाकरे, फुंडकर उपस्थित होते. यावेळी ठाणेदार चव्हाण यांनी अतिशय अमूल्य अश्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली व पोलीस प्रशासनात आपण यावे अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स आवार व गुंजकर एज्युकेशन हबच्या वतीने ठाकरे यांनी आभार प्रदर्शन केले.

0 9 5 3 7 0
Users Today : 96
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *