देऊळगाव राजा:-तालुका प्रतिनिधी
कोरोना संकट काळानंतर ऑनलाईन शिक्षण पद्धती सर्वत्र वापरली जात असल्याने राज्याच्या डिजिटल शाळा सुरु झाली पाहिजे, असा निर्णय राज्य शासनाने घेतला असून राज्यातील माझी ई-शाळा या डिजिटल साक्षर मिशन अभियानाची सुरुवात करण्यात आली. त्या अनुषंगाणे स्टार्स प्रकल्पांतर्गत शहरातील पीएमश्री फातेमा शेख न.प उर्दू प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांसाठी क्युरिआन एज्युकेशनच्या माध्यमातून डिजिटल साक्षरता, जागरूकता आणि आर्थिक साक्षरता यासंदर्भात तीन दिवसीय कार्यशाळा पार पडली.कार्यशाळेत विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना डिजिटल साक्षरता व आर्थिक साक्षरतेबाबत ध्वनी चित्रफितीच्या सहाय्याने डिजिटल साक्षरता, आर्थिक साक्षरता, २१ व्या शतकाची कौशल्य, नागरिकत्व, संविधान ओळख, एआय, असे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेचे प्रशिक्षण गायत्री राजकुंवर, राष्ट्रपाल दामोदर आणि माधुरी सरवदे यांनी दिले. त्यांना सहायक म्हणून सुमित तायडे आणि अनपोच वाकपंजर यांनी मदत केली. कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच, शाळेतील परसबाग सोबत सुंदर बागेची उभारणी करण्यात आली. तसेच संपूर्ण परिसरात स्वछता पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर आणि प्रशासनाबाबत मुख्याध्यापक अब्दुल हाई, यूनुस खान तसेच सर्व शिक्षकांचे भरभरून कौतुक करण्यात आले. या प्रशिक्षणात इयत्ता १ ली ते ४ वीपर्यंतचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.तसेच, शिक्षक सुनील सदार, अनंत वाघ, वंदना भामोद्रे, ओमलता उंबरकर, सुरेखा काळे, अनिता खडसे, राष्ट्रपाल दामोदर, प्रितेश गवई, गायत्री राजकुंवर, माधुरी सरोदे, पूजा वाकपंजार, स्नेहल वाढवे, सुधीर गवई, अनपोच वाकपंजार यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
Users Today : 96