संग्रामपूर:-तालुका प्रतिनिधी
विज्ञान-तंत्रज्ञानाच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रूजविणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा. राजेश पाटिल ताले यांनी केले.पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय पातुर्डा येथे पी.एम.श्री योजनेअंतर्गत पार पडलेल्या विद्यार्थी मार्गदर्शनपर कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक नितीन पाटिल तर प्रमुख उपस्थितीत सह शिक्षक प्रतिक ताले हे होते. प्रा. ताले पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी परिस्थितीशी सामना करून सदैव शिकण्याची जिद्द मनाशी बाळगून अभ्यास केला पाहिजे. शालेय पुस्तकांसोबत इतर पुस्तके वाचनाची सवय विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच अंगिकारावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रा. राजेश ताले यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल तसेच वाचनालय चळवळ, गाव तिथं वाचनालय या मोहिमेअंतर्गत त्यांनी स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून जवळपास ११३ वाचनालयाची स्थापना केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. नितीन पाटिल तर सुत्रसंचालन शिक्षक बी.एस. सपकाळ यांनी केले. यावेळी पी.पी. बुंदे, डि.एस. इंगळे, एस.एस. कराड, एम.एस. जुमडे, उभे, कुरवाळे, नाथपाटील, पाठक, टाकळकर, पोहोकार, मानकर, सोनाग्रे, गुरव, राऊत यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
Users Today : 96