मलकापूर:-तालुका प्रतिनिधी
स्थानिक जनता महाविद्यालयात २२ मार्च रोजी एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र उत्साहात पार पडले.कर्मयोगी संत गाडगेबाबा व पद्मश्री डॉ.वि.भि. कोलते यांच्या प्रतिमापूजन व दिपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पहिल्या सत्राला व्यासपीठावर उद्घाटक म्हणून डॉ. जयशंकर शर्मा, भाष्यकार डॉ. यज्ञेश दलवाडी, सत्राचे अध्यक्ष डी.एन.उपाख्य नानासाहेब पाटील, प्रमुख पाहुणे डॉ. अरविंद कोलते, तसेच प्राचार्य डॉ. एस. डी. चव्हाण उपस्थित होते. चर्चासत्राचा विषय ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० याचा उच्च शिक्षणावरील परिणाम-वाणज्य आणि आणि व्यवस्थापन व्यवस्थापन विद्याशाखांमधील संधी आणि आव्हाने’ हा होता. प्रास्ताविक प्रा.डॉ.पी.एन. लढे यांनी केले. डॉ. जयशंकर शर्मा यांनी आपल्या व्याख्यानातून एनईपीमधील बदल आपण कसे स्विकारावेत व प्रत्यक्ष अंमलात आणून त्यांची अंमलबजावणी कशी करावी यावर मार्गदर्शन केले. भाष्यकार डॉ. यज्ञेश दलवाडी यांनी प्रगत भारत आपल्याला बनवायचा हाच उद्देश एनईपीमध्ये समाविष्ट असल्याचे सांगितले. डॉ. अरविंद कोलते यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा कौशल्यपूर्ण विकास करण्याच्या दृष्टीने एनईपी अभ्यासावे व प्रत्यक्ष अमलात आणावे, असे निवेदन केले. डी.एन. पाटील यांनी राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्राचे आयोजन ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे सांगितले. डॉ.जे.डी. गुप्ता, प्रमुख वक्ते अर्जुन खांजोडे, डॉ. संग्राम रघुवंशी यावेळी उपस्थित होते. डॉ. अर्जुन खानझोडे यांनी विद्यार्थ्यांची मानसिकता, दृष्टिकोन, व्यक्तीमत्व यांचा प्रवाह विकासाच्या दृष्टीने बदलणे अभिप्रेत असल्याचे सांगितले. डॉ.जे. डी. गुप्ता यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे ध्येय एनईपीचे असल्याचे सांगितले. समारोपीय सत्राचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधीर चव्हाण, अतिथी डॉ. महेश डाबरे, डॉ. वासुदेव गोलाईत व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. वासुदेव गोलाईत यांनी एनईपीद्वारे पडणारे प्रश्नांवर प्रकाश टाकला. सुत्रसंचालन प्रा.डॉ. पुनम काबरा, प्रा.डॉ. रुपाली इंगळे, प्रा.डॉ.आर.आर.जोशी, प्रा.के. सी. इंगळे यांनी केले. आभारप्रदर्शन डॉ. पूनम काबरा यांनी मानले.यावेळी डॉ. लक्ष्मण कोलते, डॉ. शुक्ला, डॉ. पवार, डॉ. दत्ता धुमाळे, डॉ. भोगे व डॉ. योगेश सरदार, प्रा.डॉ.पूजा सावजी, प्रा. शारदा खर्चे, प्रा. पल्लवी चौधरी, प्रा.प्रीती नाये, प्रा.नाफडे, प्रा. सीमा खंडकर, प्रा. प्रांजली क्षीरसागर, प्रा. शीतल फिरके व प्रा.लता लढे ह्या उपस्थित होत्या.
Users Today : 96