संग्रामपूर:-तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील वानखेड येथे अल्पभुधारक शेतकरी कुटुंबात जन्मलेले प्रा आनंद भोजने यांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणीक क्षेत्रातील अमुल्य दिलेल्या योगदानाची दखल घेऊन आदर्श शिक्षक कोल्हापुर भुषण महागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.5, ना नी 1. ८, वा प्रा. आनंद भोजने यांचे प्राथमिक शिक्षण १० वी पर्यंत वानखेड येथे झाले. तर उच्च शिक्षण संभाजीनगर येथे स्वालंबीपणाने मिळेत काम करून उच्च शिक्षण घेऊन प्राध्यापक झालेत. काही दिवस विद्युत वितरण कंपनी सेवा दिल्यानंतर कोल्हापूर येथे कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडविले. मात्र, जन्मभूमि असलेल्या संग्रामपूर तालुक्याशी त्यांची नाळ जुळलेली आहे. प्रा. आनंद भोजने यांनी कोल्हापुरात सामाजिक, शैक्षणीक क्षेत्रात नाव लौकीक मिळवले. त्यांच्या कामाची दखल घेवून अन्याय ग्राफीक्सच्या वतीने गोविंदराव टेंबे रंगमंदिर देवल क्लब येथे आयोजित विचार परिवर्तन संम्मेलनात सामाजिक कार्यकर्ते प्रा आनंद भोजने यांना कोल्हापूर भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार माजी आमदार संपतराव पवार पाटील, उपराकार लक्ष्मण माने यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी चंदगडचे ज्येष्ठनेते एम.जे. पाटील, रिपाइं जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, माजी नगरसेविका प्रज्ञा उतुरे, सरपंच देवानंद पाटील, समाज कल्याण विभागाच्या डवरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
Users Today : 96