हमीभाव तूर खरेदीचा शुभारंभ

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी 

बुलढाणा तालुका शेतीमाल खरेदी विक्री सहकारी समितीच्या वतीने शासकीय हमीभावाने तूर खरेदी करण्यासंदर्भात काटा पूजन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महालेयांचे प्रतिनिधी म्हणून अंकुशराव पडघान तसेच बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांचे प्रतिनिधी म्हणून कुणाल गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे अध्यक्ष अॅड मोहन पवार, बाजार समिती सचिव वनिता साबळे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, दीपक तुपकर, माजी अध्यक्ष सखाराम नरोटे, संचालक अश्रुजी अंभोरे, छायाताई गाडे, तेजस्विनी गोडबोले, प्रकाश राऊत, संजय गाडे, रामेश्वर शिंदे, संस्थेची कर्मचारी वृंद व शेतकरी उपस्थित होते.

0 9 5 3 6 9
Users Today : 95
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *