बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांचेवर विडंबनात्मक गाणे तयार करून त्यांची प्रतिमा मलीन प्रयत्न करणाऱ्या कॉमेडीयन कुणाल कामराविरूध्द तत्काळ कारवाई करा, अन्यथा शिवसेना स्ट्राईलने त्याला धडा शिकविला जाईल, असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. याबाबत ठाणेदार बुलढाणा यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेवर विडंबनात्मक गाणे तयार करून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचे काम विकृत वृत्तीच्या कॉमेडीयन कुणाल कामरा याने केले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील वातावरण दुषित झाले असून जनमानसात व शिवसैनिकांमध्ये तिव्र स्वरूपाचा आक्रोश निर्माण झाला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून सदर माथेफिरू कॉमेडीयन कुणाल कामराविरूध्द तत्काळ कारवाई करून त्याचा माफीनामा सादर करावा, अन्यथा शिवसेना स्टाईलने त्याला धडा शिकवल्या जाईल, असा इशारा निवेदनाअंती दिला आहे. निवेदन देताना शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख भोजराज पाटील, बुलढाणा तालुका प्रमुख धनंजय बारोटे, बुलढाणा शहर प्रमुख गजेंद्र दांदडे, युवासेना तालुकाप्रमुख श्रीकांत जाधव, युवासेना शहर प्रमुख श्रीकांत गायकवाड, उपतालुका प्रमुख माणिकराव सावळे, उपतालुका प्रमुख रतन नरोटे, उपतालुका प्रमुख अनिल जगताप, उपतालुका प्रमुख हरिदास रिंढे, युवा उपतालुका प्रमुख हरिदास कड, शिवसेना विभाग प्रमुख सुमन इंगळे सुंदरखेड शहर प्रमुख विजय इल्लरकर, प्रशांत राजकुमार जांगडे, रामा जाधव आदींची उपस्थिती होती.
Users Today : 95