एकाच बस सेवेमुळे प्रवाशांची गैरसोय नव्याने बस सुरू करण्याची मागणी

Khozmaster
2 Min Read

शेंदुर्जन:-तालुका प्रतिनिधी 

मेहकर ते संभाजीनगर ही बस सेवा देऊळगाव माळी ते साखरखेर्डा या मार्गे सात वाजता शेंदुर्जन थांब्यावर येते. प्रवाशांच्या वाढलेल्या संख्येमुळे ही बस नेहमी फुल्ल असते. त्यामुळे शेंदुर्जन या ठिकाणी बसची प्रतिक्षा करणाऱ्या प्रवाशांना बसायला जागाच उपलब्ध नसते. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून या मार्गावर नव्याने अधीक एक बससेवा सुरु करावी, अशी मागणी होत आहे.मेहकर ते संभाजीनगर ही बस सेवा देऊळगाव माळी ते साखरखेर्डा या मार्गे सात वाजता शेंदुर्जन थांब्यावर येते. परंतु ही बस देऊळगाव माळी, साखरखेर्डा व इतर थांब्यांवरून आधीच फुल्लल भरून येत असल्याने या बसमध्ये शेंदुर्जन येथील प्रवाशांना जागा मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांना उभ्याने प्रवास करून संभाजीनगर येथे जावे लागते. यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात शारीरीक त्रास सहन करावा लागत आहे. काही प्रवाशांना उभे राहण्याला सुद्धा जागा नसल्यामुळे त्यांना खाजगी वाहनांवा आधार घ्यावा लागतो. अशावेळी खाजगी वाहनधारक दुप्पटीने भाडे वसुलतात. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. ही बस निघुन गेल्यानंतर संभाजीनगर येथे जाण्यासाठी रात्री दहा वाजेपर्यंत कोणतीच बस नसल्यामुळे शाळेतील विद्यार्थी, व्यापारी वर्ग, हॉस्पिटलला जाणारे रुग्ण यांची प्रचंड गैरसोय होत आहे. सद्या लग्नसराई सुरू झाल्याने या बससेवेवर अधीकच तान येत आहे. त्यामुळे बसचे चालक-वाहक सदर बस थांब्याच्या काही अंतरावर उभी करुन बसमधील उतरणारे प्रवाशी खाली उरवून पुढे निघुन जाते. त्यामुळे अनेक प्रवाशांची चालक-वाहकासोबत हुज्जत होते. विनाकारण बसच्या वाहक व चालकाला मनस्ताप सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी साखरखेर्डा ते संभाजीनगर मार्गावर नवीन बससेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

0 9 5 3 6 9
Users Today : 95
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *