बार्शीटाकळी:-विशेष प्रतिनिधी
पं.स. बार्शिटाकळी जि.प. अकोला अंतर्गत जि.प.प्रा.शा. शेलू खुर्द शाळेचा सत्तरावा वर्धापन दिवस नुकताच शेलू खुर्द येथील सभागृहात उत्साहाने साजरा करण्यात आला. विद्यार्थीच नव्हे तर समस्त गावकरी मंडळी वाढदिवस सोहळ्याला उस्फूर्त प्रतिसाद देतात. शाळेच्या वधार्पना दिना निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून सरपंच सौ. श्रद्धाताई गोपाल महाले उपस्थित होत्या. मु.अ. रवींद्र इंगोले यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. शा.व्य.स.अ.संदीप महल्ले यांनी भुमिका वठवली. वाढदिवसानिमित्त केक कापून विद्यार्थ्यांना वाटण्यात आला. शाळेच्या वाढदिवसानिमित्त २३ मार्च २०२५ सायं सात वाजता अकोला येथील हास्यसम्राट स्व. अरविंद भोंडे यांचा हास्यातून प्रबोधनाचा वसा घेतलेले हास्यवीर प्रशांत भोंडे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.. सुप्रसिद्ध कवी प्रशांत भोंडे यांनी श्रोत्यांना सतत दोन तास खळखळून हसवले आणि प्रसंगी रडवलेही. राष्ट्रीय एकात्मता शिक्षण, आरोग्य, इ. विषय घेऊन प्रबोधन केले. स्वागत समारोहाचे सुत्रसंचालन इयत्ता तिसरीच्या श्रावणी महल्ले हिने केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल गोंडचवर यांनी केले. शंकर महल्ले यांनी मार्गदर्शन केले. वाढदिवस सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी संचित महल्ले, अर्णव कुळमते वंश मडावी, ओम महल्ले, शौर्य महल्ले, साई कुळमते, दर्पण महल्ले, विधी महल्ले, अर्णवी महल्लेसह समस्त गावकऱ्यांनी परिश्रम घेतले तर आभार प्रदर्शन शिवव्याख्याते प्रतीक महल्ले यांनी केले.
Users Today : 96