श्रावणबाळ व संजय गांधी योजनेची प्रकरणे निकाली काढा

Khozmaster
1 Min Read

मोताळा:-तालुका प्रतिनिधी 

तालुक्यातील श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेचे प्रकरणे तहसिल कार्यालयात प्रलंबीत आहे. अनेक अर्जदारांनी प्रकरणांची पूर्तता करुन परत सादर केली आहेत. मात्र, दोन ते तीन महिन्याचा कालावधी उलटून देखील ते निकाली काढले नसल्यामुळे लाभार्थ्यांना मोठा त्रास सहन करावी लागत आहे. सदर प्रकरणे तत्काळ निकाली काढण्याची मागणी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली. गेल्या अनेक दिवसापासून मोताळा तालुक्यातील श्रावणबाळ योजना व संजय गांधी निराधार योजनेचे प्रकरणे तहसील कार्यालयात प्रलंबित आहे. अनेक अर्जदारांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूण प्रकरणे सादर केली आहेत. मात्र, आजपावेतो सदर प्रकरणे निकाली काढण्यात आली नाही. प्रकरणे निकाली काढण्यासाठी अर्जदारांना तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत असल्यामुळे नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. सदर अर्जदारांची प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यात काढण्यात यावीत, अन्यथा क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरीनेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन छेडण्याच्या इशारा निवेदनाअंती देण्यात आला. निवेदन देताना महेंद्र जाधव, सैय्यद वसीम, प्रदिप शेळके, जाबीर खान, चंदू गवळी, भागवत धोरण, राजू शिंदे, कादर खान, विजय बोराडे, सैय्यद ताज, राजू पनहाळकर, गजानन गवळी, शे इब्राहिम, सागर पुरभे, हिदायत खान, दत्ता पाटील, संदीप गोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

0 9 5 3 7 0
Users Today : 96
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *