लोणार:-तालुका प्रतिनिधी
लोणार व मेहकर तालुक्याच्या युवा सेनेची बैठक युवासेना जिल्हा प्रमुख ऋषी जाधव यांच्या नेतृत्वात शिवसेना कार्यालयात आज २५ मार्च रोजी पडली.
बैठकीत जिल्हा प्रमुख ऋषी जाधव यांनी लोणार शहर युवा सेना शहराध्यक्षपदी देवा ठाकुर यांची नियुक्ती पत्राव्दारे नियुक्ती केल. या वेळी बोलतांना ऋषी जाधव यांनी आपण सर्वांना शिवसेना पक्षात काम करण्याची जी संधी मिळाली तिचे सोने. ज्यास्तीत ज्यास्त तरुणांना या मध्ये शामिल करून गाव तेथे शाखा स्थापन करण्याचे आवाहन केले. देवा ठाकूर हे अनेक वर्षांपासून पक्षवाढीसाठी काम करत आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन उपरोक्त निवड करण्यात आली असून पक्ष वाढून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचे स्वप्न पूर्ण करून शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी तरुणांची ताकत उभी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी युवा सेना नेते नीरज रायमूलकर, शैलेश सरकटे, मेहकर युवासेना तालुका प्रमुख भूषण घोडे, लोणार युवासेना तालुका प्रमुख गजानन मापारी यांच्यासह शेकडो युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते.
Users Today : 95