चिखली:-तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथे २३ मार्चच्या पहाटे दोन वाजता अज्ञात माथेफिरूने पेट्रोल टाकून दोन दुचाकींना आग लावली. या घटनेने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.संकेत ज्ञानेश्वर सपकाळ आणि राधेश्याम देवराव काळे यांच्या मालकीच्या हीरो कंपनीच्या स्प्लेंडर प्लस आणि स्प्लेंडर गाड्या घरांसमोर उभ्या होत्या. अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून पेटवून दिल्याने दोन्ही दुचाकी भस्मसात झाल्या. ही घटना लक्षात येताच शेजारील महिलेने आरडाओरड केली. त्यामुळे ग्रामस्थ खडबडून जागे झाले आणि धावपळ करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन तातडीने तपास करावा, अशी मागणी होत आहे. तसेच, रात्रीची गस्त वाढवावी आणि ग्रामपंचायत प्रशासनाने गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.या घटनेबाबत अमडापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Users Today : 133