नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा कधी?

Khozmaster
2 Min Read

देऊळगाव राजा:-तालुका प्रतिनिधी 

नागपुर ते मुंबई समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा कधी सुरू होणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.सध्या नागपूर ते इगतपुरीपर्यंतचे अंतर ६२५ किलोमीटर असून, तिथपर्यंतच वाहतूक सुरू आहे. इगतपुरी ते मुंबई असे ७६ किलोमीटरच्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. मार्चमध्ये अंतिम टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे सांगितले जाते आहे. १ एप्रिलपासून टोलमध्ये वाढ होणार आहे. तत्पूर्वी अंतिम टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. नागपूर ते मुंबईपर्यंत ७०१ किलोमीटरचा महामार्ग हा देशातील सर्वाधिक अत्याधुनिक एक्स्प्रेस वे ठरणार आहे. कसारा घाटातून आठ किलोमीटर लांबीचा बोगदा अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावर एकूण ६ लेन असून रुंदी १२० मीटर आहे. चार चाकी वाहनामधून १२० किलोमीटर प्रती तास वेगाने प्रवास करताना नागपूर ते मुंबई पावतोचा प्रवास केवळ ८ तासात करता येईल. त्यामुळे वेळ व इंधनाची बचत होणार आहे. तेव्हा समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा वाहतुकीसाठी लवकरात लवकर खुला करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. अंतिम टप्पा वाहतुकीसाठी खुला झाल्यास नागपूर ते मुंबई थेट प्रवास कमी वेळात पूर्ण करता येईल.
समृद्धी महामार्गावरील वाहतूक सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सोबतच अपघाताची मालिका सुरूच आहे. वाहनचालकांना विश्रांती घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे वाहन चालकाला डुलकी लागून अपघात होत असल्याचे दिसून येत आहे. वाहनांची तपासणी आरटीओमार्फत होताना दिसत नाही. त्यामुळे सुद्धा अपघात होत आहे. अपघाताची मालिका थांबविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.

0 9 5 4 0 7
Users Today : 133
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *