जळगाव जामोद:-तालुका प्रतिनिधी
राज्याच्या अर्थसकल्पीय अंतिम आठवडा प्रस्तावावर सभागृहाचे लक्ष वेधताना आ.डॉ. संजय कुटे यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था, सिंचन, शिक्षण, परिवहन, रोजगार आणि उद्योग यासह अनेक विषयांना हात घालत सविस्तर भाषण केले. उद्योग आणि रोजगार या विषयी बोलताना कच्या मालावर आधारित उद्योग हे ग्रामीण भागात उभारले गेले पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी शासनाकडे केली.राज्यात दरवर्षी लाखो कोटींचे उद्योगावर करार होतात आणि त्यातील बहुतांश उद्योग हे मुबंई, पुणे, नाशिक आणि संभाजीनगर या परिसरातच सुरु होतात. त्यामुळे राज्यातील प्रत्येक तरुणाला रोजगारासाठी या महानगराकडे जावे लागते. हेच उद्योग जर राज्यातील मूलभूत सोयी सुविधाने परिपूर्ण असलेल्या मतदारसंघात उभारल्यास ग्रामीण भागातील तरुण युवकांचे स्थलांतर थांबून त्यांना घराजवळच रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे असे उद्योग उभारण्याबाबत राज्य सरकारने ठोस पावले उचलत एक समिती गठीत करावी आणि धोरणात्मक निर्णय घ्यावा, जेणेकरून राज्यातील ग्रामीण भागाचा विकास झपाट्याने होईल. राज्यामध्ये असे अनेक मतदारसंघ आहेत, कि जिथे कच्च्या मालावर आधारित उद्योग उभारता येऊ शकतात. याबाबत उदाहरण देतांना उद्योग उभारण्यासाठी जळगाव जामोद मतदारसंघांत उद्योगासाठी ज्या मुलभूत सुविधांची आवश्यकता असते, त्या आज पुर्ण झाल्या असुन त्यात उद्योगासाठी लागणारे पाणी, विज, सौर ऊर्जा, प्रशस्त असे राज्य व राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे नेटवर्क, पुरेशे मनुष्यबळ आणि कच्या मालाची सुबत्ता असल्याने गरज आहे, ती उद्योग उभारण्याची. यावर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा, अशी मागणी देखील त्यांनी सभागृहात केली.
Users Today : 133