खामगावात मोठ्या चोरीचा प्रयत्न फसला पोलीस आल्याचे पाहून ऐवज फेकून चोरटा पसार

Khozmaster
2 Min Read

खामगाव:-तालुका प्रतिनिधी 

सिव्हिललाईन भागात २६ मार्चच्या मध्यरात्री अॅड. केतन भाटे यांच्या वहिनीच्या घरात अज्ञात चोरटा घुसला. भाटे यांच्या घरात चोरटा घुसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आल्याचे लक्षात येताच चोरट्याने घरातून चोरी केलेले सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज तिथेच फेकुन घराच्या भितीवरून पसारा झाला. त्यामुळे चोरट्याचा चोरीचा प्रयत्न फसला.स्थानिक सिव्हिललाईन परिसरात राहणाऱ्या अॅड. केतन भाटे यांच्या वहीनी मनिषा अभय भाटे या घराला कुलूप लावुन अयोध्या येथे गेल्या आहेत. या संधीचा फायदा घेत २६ मार्चच्या रात्री दोन वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलुप ताडुन घरात प्रवेश केला. घरातील लाइट लावुन तोडफोड करीत असतांना आवाज आल्याने अॅड. केतन भाटे यांचे वडील यांनी उठुन पाहील असता, त्यांना घरातील लाइट चालु दिसली व घरात कोणीतरी संशयीत इसम असल्याचे लक्षात आले. त्यांनी समय सूचकता दाखवत लगेच याबाबत शहर पोलीस स्टेशनला घटनेची माहीती दिली. यावरून रात्र गस्तीवर असलेले पोउपनि मोहन करुटले व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. संरक्षण भिंतीचे गेट उघडुन पोलिसांनी आत प्रवेश केला. पोलीस आल्याचे लक्षात येताच चोरट्याने चोरी केलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकमेची पिशवी, असा लाखो रुपयांचा ऐवज तेथेच टाकून देत मागील बाजुने भिंतीवरुन पळुण गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. परंतु, तो मिळूण आला नाही. या प्रकरणी पोलिसांनी अॅड. केतन भाटे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत असून या घटनेने शहर परिसरात खळबळ उडाली आहे.

0 9 5 4 0 7
Users Today : 133
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *