डोणगाव:-तालुका प्रतिनिधी
घरासमोर उभ्या असलेल्या चारवर्षीय बालकावर सहा ते सात कुत्र्यांनी हल्ला केला. यात मुलगा गंभीर जखमी झाला १६ मार्चच्या रात्री आठ वाजता शिवाजी हायस्कूलच्या मैदानाजवळ ही घटना घडली.शेख आफताब शेख इम्रान (वय चार) असे जखमी बालकाचे नाव आहे. त्याच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत. डोणगाव येथील शिवाजी हायस्कूल ग्राउंडजवळील आपल्या घरासमोर शेख आफताब २६ मार्चच्या रात्री आठ वाजता खेळत होता. यावेळी सहा ते सात भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. त्याची आरडाओरड पाहता त्याची आजी घरातून बाहेर आली. त्यांनी बालकास कुत्र्यांच्या तावडीतून सोडविले. छाती, मान आणि पायाला कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केले. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर मुलास पुढील उपचारासाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.मागील काही महिन्यांपासून डोणगावमध्ये बाहेरून भटके कुत्रे आणून सोडण्यात आल्याने गावात जागोजागी कुत्र्यांची कळवंड पाहायला मिळत आहे. शेकडोंच्या संख्येने मोकाट कुत्रे गावात भटकत आहेत. खायला काही मिळत नसल्याने कुत्र्यांनी शेळ्या, डुकरांसोबतच आता लहान मुलांवर हल्ले सुरू केले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Users Today : 133