‘एलसीबी’ने आवळल्या दोन गुटखा तस्करांच्या मुसक्या बोलेरो पिकअपसह लाखो रुपयांचा गुटखा जप्त

Khozmaster
2 Min Read

डोणगाव:-तालुका प्रतिनिधी 

गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन गुटखा तस्करांच्या मुसक्या आवळण्यात बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. यावेळी पथकाने बोलेरो पिकअप वाहनासह लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला. आज २७ मार्चच्या सकाळी डोणगाव पोलीस स्टेशन हद्दित येणाऱ्या लोणी गवळी रस्त्यावर असलेल्या समृध्दी महामार्गाच्या पुलाजवळ ही कारवाई करण्यात आली.राज्य शासनाने महाराष्ट्रात गुटखाबंदी कायदा लागु केलेला आहे. असे असतांनाही लगतच्या मध्यप्रदेश राज्यातून करोडो रुपयांच्या गुटख्या जिल्ह्यात आयात होत आहे. दरम्यान, अमडापूर पोलीस स्टेशन हद्दितून बोलेरो पिकअप वाहनातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे आज २७ मार्चच्या सकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कानडे, पोलीस अंमलदार शेख चांद व युवराज राठोड यांनी अमडापूर पोलीस स्टेशन हद्दित नाकाबंदी केली. समोरुन येणारी बोलेरो पिकअप क्रमांक एमएच-०४-एचडी १४६२ ला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिकअप चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन अधीकच वेगाने दामटत डोणगाव रस्त्याने धूम ठोकली. पथकाने सदर वाहनाचा पाठलाग करत डोणगाव पोलिसांना नाकाबंदी करण्याच्या सुचना दिल्या. त्यावरुन डोणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार पवन गाभणे व हर्ष सहगल यांनी लोणी गवळी रस्त्यावर असलेल्या समृध्दी महामार्गाच्या पुलाजवळ सापळा रचून सदर वाहन पकडले. वाहनाची झडती घेतली असता, त्यामध्ये आरोपी आरोपी सैय्यद आरीफ सैय्यद हाशम (रा.अमडापुर) व चालक अमजदखान (रा. साखरखेर्डा) याच्या ताब्यातून अंदाजे १५ लाख रुपयांचा गुटखा मिळून आला. पोलिसांनी सदर गुटख्यासह बोलेरो वाहन, असा एकुन २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून उपरोक्त आरोपींना ताब्यात घेण्यात आले आले. याबाब अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती देण्यात आली असून वृत्त लिहेस्तोवर संबंधीत विभागाचे कोणतेही अधिकारी पोलीस स्टेशनला पोहोचले नाही. त्यामुळे पोलिसांना उशीरापर्यंत गुन्हा दाखल करता आला नाही.

0 9 5 4 0 7
Users Today : 133
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *