आगीतील जखमी संदीप शिंगणेंचा मृत्यू व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने पाळला बंद

Khozmaster
1 Min Read

देऊळगाव मही:-तालुका प्रतिनिधी 

चिखली जालना महामार्गावरील संदीप किराणा, सायकल स्टोअर व अन्य एका दुकानाला लागलेली भीषण आग विझविण्याच्या प्रयत्नात टायरच्या धुरामुळे श्वासोस्वास घेण्यास अडचण निर्माण होवून जखमी झालेल्या संदीप श्रीराम शिंगणे (वय ४० वर्षे) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चिखली-जालना महामार्गावरील तीन दुकानांना २३ मार्चच्या पहाटे भीषण आग लागली होती. ही आग विझविण्याचा प्रयत्न करणारे संदीप शिंगणे यांच्या नाकात व पोटात टायरचा धूर गेल्याने त्यांना श्वास घेण्यास अडचण निर्माण झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यामुळे त्यांना दंदाले हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ भरती करण्यात आले होते. सदर ठिकाणी प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना जालना येथील आस्था हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. तब्येतीत सुधारणा होत नसल्यामुळे त्यांन पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सदर ठिकाणी उपचार सुरु असतांना त्यांची प्राणज्योत मालवली. त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष समाधान शिंगणे व सर्व व्यापाऱ्यांनी आपापले प्रतिष्ठाणे स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण केली.

0 9 5 4 0 7
Users Today : 133
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *