जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या नियमबाह्य नियुक्त्यांची चौकशीची करा : संतोष भुतेकर

Khozmaster
1 Min Read

चिखली:-तालुका प्रतिनिधी 

बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या केलेल्या नियमबाह्य नियुक्त्यांवरून युवासेनेचे उपजिल्हाध्यक्ष संतोष भुतेकर यांनी विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून सामान्य प्रशासन विभागाच्या २०१६ च्या शासन निर्णयाचे उल्लंघन केल्याचा आरोप भुतेकरांनी केला आहे.विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांना दिलेल्या निवेदनात नमुद आहे की, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी रवींद्र लहाने आणि इतर पाच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करताना महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध नसलेल्या शासन निर्णयाचा आधार घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या २०१६ च्या शासन निर्णयानुसार, ‘गट क’ आणि ‘गट ड’ संवर्गातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना करार पद्धतीने नियुक्त करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना नाहीत.तरीही, जिल्हाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करून आणि शासन निर्णयाचा अवमान करून या नियुक्त्या केल्या आहेत. त्यामुळे गामुळे नियमबाह्य नियमब नियुक्त्या तातडीने रद्द कराव्यात आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या या प्रकरणाची सखोल चौकशी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.वेतनाची वसुली जिल्हाधिकाऱ्यांकडून करावी रवींद्र लहाने यांच्या नियुक्तीची आणि त्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडील कामाची चौकशी करावी. दुसरे स्वीय सहाय्यक खिराडे यांच्या बदलीच्या आदेशाची आणि त्यांच्या उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्याकडील कामाची चौकशी करावी. जर तक्रारीवर १५ दिवसांच्या आत कारवाई झाली नाही, तर ते अमरावती महसूल आयुक्त कार्यालयासमोर किंवा इसरूळ ग्रामपंचायतीसमोर उपोषण कण्याचा इशारा देखील भुतेकर यांनी दिला आहे.

0 9 5 4 0 7
Users Today : 133
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *