बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी
अस्मितादर्श या साहित्यिक मासिकाचे संपादक तथा फुले-आंबेडकरी चळवळीचे वैचारिक भाष्यकार डॉ. गंगाधर पानतावणे हे केवळ साहित्यिक नव्हते तर त्यांनी उणीपुरी पन्नास वर्षे अस्मितादर्श या दर्जेदार वाडःमयीन नियतकालिकाचे संपादक राहिले होते. ते जसे साहित्यिकांचे आदर्श आहेत तसेच पत्रकारांचेही आदर्श ठरतात, असे विचार ज्येष्ठ पत्रकार अरुण जैन यांनी व्यक्त केले.स्थानिक पत्रकार भवन येथे २७ मार्च २०२५ रोजी पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावने यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत बर्दे, सिद्धार्थ आराख, नीलेश जोशी, नितीन सिरसाठ, गणेश निकम, रंजितसिंग राजपूत, भानुदास लकडे, नाट्यकर्मी शशिकांत इंगळे, शाहीर डी. आर. इंगळे, सुरेश साबळे, मांगीलाल राठोड, खंडेराव आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या प्रतिमेला उपस्थितानी पुष्पहार पुष्प अर्पण करून अभिवादन केल्यानंतर शाहीर डी. आर. इंगळे, साहित्यिक सुरेश साबळे आणि मांगीलाल राठोड यांनी अभिवादनपर मनोगत व्यक्त केले.
Users Today : 133