शेंदूर्जन:-तालुका प्रतिनिधी
जवाहरलाल नेहरू नवोदय विद्यालय परीक्षा सण २०२४-२०२५ मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये प्रांजली जाधव या विद्यार्थिनीची निवड झालेली आहे. या वर्षी सुद्धा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा (सवडद) ने नवोदय सारख्या स्पर्धा परीक्षांच्या यशाची परंपरा कायम ठेवली.जिल्हा परिषद सवडद शाळेला उपक्रमांचे माहेरघर संबोधल्या जाते. विविध उपक्रमांमध्ये थोर समाज सुधारक यांच्या जीवन चरित्रावर निबंध स्पर्धा, प्रश्न मंजुषा, रांगोळी स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, सामुदायिक कवायत, वर्ग सजावट, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, विद्यार्थी वाढदिवस साजरा करणे, विविध रंगी सांस्कृतिक कार्यक्रम, आयोजित करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिल्या जातो. शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबरोबर सर्वांगीण विकास व संस्काराचे धडे रुजवले जातात. या वर्षी नवीनच शाळेची रंगरंगोटी, वटवृक्षास ओटा करून तसेच रंगमंच्याची रंगरंगोटी व सजावट करण्यात आलेली आहे. शाळेला भव्य पाटांगण असल्याने भरपूर प्रमाणात वृक्ष लागवड केल्याने शाळेच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे.प्रांजली आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक शिक्षक सय्यद, संदिप मुंडकुळे, संदिप मान्टे व मुख्याध्यापक रमेश जैवळ तसेच वर्गशिक्षक अनंत रिंढे यांना देते. शाळेच्या यशाच्या चढत्या आलेखामध्ये शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष व सदस्य तसेच ग्रामपंचायत सवडद येथील सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच गावाकऱ्यांचे योगदान आहे.
Users Today : 131