पीएमश्री केंद्रपुरस्कृत योजनेंतर्गत शिक्षकांचा अभ्यास दौरा

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी 

पीएमश्री केंद्रपुरस्कृत योजनेंतर्गत २०२४-२०२५ मध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, बुलढाणा यांच्या वतीने जिल्ह्यातील माटरगाव, आसलगाव व धाड येथील २० शिक्षकांचा अभ्यासदौरा उत्तराखंड, डेहराडून या ठिकणी १५ ते २२ मार्च दरम्यान उत्साहात पार पडला.या अभ्यासदौयाच्या माध्यमातून दिल्ली येथील अल्ब आदर्श बाल विद्यालय, सर्वेदय कन्या विद्यालयात भेटी देण्यात आल्या. तसेच या विद्यालयातील भौतिक सुविधाचा विकास कसा झाला हे देखील समजून घेण्यात आले. त्यांनंतर डेहराडून उत्तराखंड येथील विविध शासकीय शैक्षणिक संस्थाना भेटी देण्यात आल्या. यावेळी उत्तराखंड राज्यात शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी कोणते प्रयत्न केले, याविषयी माहिती घेण्यात आली. याशिवाय देहराडून येथील राज्य शैक्षणिक अनुसंधान एवं प्रशिक्षण परिषद, उत्तराखंड या संस्थेस भेट दिली. संस्थेचे संचालक कृष्णा बिजललवान यांच्या सोबत चर्चा करण्यात आली. या अभ्यासदौऱ्यात माटरगाव, आसलगाव तसेच धाड येथील शिक्षकांनी सहभाग घेतला होता.

 

0 9 5 4 0 5
Users Today : 131
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *