लोणार:-तालुका प्रतिनिधी
ईश्वर हा सृष्टीचा निर्माता असल्याने सर्व जण त्याचीच लेकरे आहोत. आपल्याला न कळल्याने भेदाभेदाचे घोटाळे होतात. तेव्हा एक मेकांना तुच्छ लेखने ही पशू वृत्ती आहे, असे प्रतिपादन आनंदगडचे मठाधीश भगवानबाबा आनंदगडकर यांनी केले. लोणार तालुक्यातील गुंधा येथे क्रांती गुरू लहुजी साळवे स्मृति राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संत गजानन महाराज सेवा संघाध्यक्ष हभप नन्हई महाराज यांचे अध्यक्षतेत २२ मार्च रोजी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतीमा पुनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सालाबादाप्रमाने यंदाही विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा क्रांती गुरू लहुजी साळवे स्मृति राज्यस्तरीय पुरस्कार देऊन भगवानबाबा आनंदगडकर महाराज यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. हभप नन्हई महाराज यांचे अध्यक्षीय भाषण झाले. नयन ओव्हर या चिमुकल्याने क्रांती गुरू लहुजी साळवे यांच्या वरील व्याख्यानाने उपस्थितांची मने जिंकली. डॉ. अंबादास सगट, प्रा.धनंजय भिसे, डॉ. सचिन साबळे यांनी मनोगत व्यक्त केले. विठ्ठलराव गिलवरकर यांनी प्रास्ताविकातून पुरस्कार वितरण सोहळ्या चा उद्देश स्पष्ट केला. या वेळी रामदास मापारी यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना उद्योगरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांच्यासह राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या २५ जणांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी संदीप मानकर, केशवराव फुके, सरपंच गजानन माने, उपसरपंच गोविंद राऊत, माजी सरपंच अश्रूजी फुके, आयोजक शंकरराव मानवतकर यांची मंचावर उपस्थिती होती. तर ग्रा.पं. सदस्य दीपक मानवतकर, पुरुषोत्तम केंद्रे, सुरेश मानवतकर, सोपानराव देबाजे, गजानन गोरे, गजानन तिरके, सुधाकर माने, लक्ष्मण महाराज भुजबळ, मुख्याध्यापक दिगंबर ढव्हळे, डॉ. विजू मोरे, जीवन घायाळ, रमेश ओव्हर, बबनराव ओव्हर यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन ज्ञानदेव मानवतकर तर आभार शंकर मानवतकर यांनी मानले.
Users Today : 131