भारतीय मानवाधिकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रशांत डोंगरदिवे

Khozmaster
1 Min Read

चिखली:-तालुका प्रतिनिधी 

बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि फुले-शाहू-आंबेडकर चळवळ गतिमान करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत डोंगरदिवे यांची भारतीय मानवाधिकार संघटनेच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी मानवी हक्क संरक्षण कायदा आणि इतर संबंधित कायद्यांचा प्रचार आणि प्रसार करून प्रशांत डोंगरदिवे मानवी हक्कांसाठी सतत संघर्ष करत आहेत. भारतीय मानवाधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सौरव बेरा कोलकाता, पश्चिम बंगाल यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड केली आहे.

 

0 9 5 4 0 5
Users Today : 131
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *